गिर्यारोहण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’ (Shikhar Savarkar Purskar) चे वितरण महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच खंडेनवमीला, शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायंकाळी ४.०० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे होणार आहे.
पुरस्कार खालील प्रमाणे -
1. '
शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार' - पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल, उत्तराखंड
2. शिखर सावरकर दुर्गसंवर्धन पुरस्कार – सिस्केप, रायगड
3. शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार – इंद्रनील खुरंगळे
या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर हेही उपस्थित रहाणार आहेत.
कृपया खालील वृत्तास आपल्या नियतकालिकात आणि वृत्त वाहिनीवर यथायोग्य आणि न्याय्य प्रसिद्धी द्यावी तसेच कार्यक्रमास आपले प्रतिनिधी पाठवून द्यावेत ही विनंती.
धन्यवाद
आपला नम्र
राजेंद्र वराडकर
कार्यवाह - ८८७९६५९७६५
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
अधिक माहितीसाठी संपर्क – धनंजय शिंदे – ९८६९१२८५३६
No comments:
Post a Comment