मतदारांच्या माहितीसाठी
https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध आहे या संकेत स्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.
Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App- उमेदवारांबाबत माहिती या app वर उपलब्ध होऊ शकेल. C vigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करता येते त्यानंतर त्यावर केलेल्या कारवाईची माहिती 100 मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्र.- 022-2082 2781, निवडणूक नियंत्रण कक्ष - 7977363304
सुविधा पोर्टल
उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरता व निवडणूकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या मिळणेसाठी अर्ज करण्याकरिता सुविधा या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
C-Vigil app
दि.15 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 14 तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर NGSP पोर्टलवर 101 तक्रारी प्राप्त झाल्या असून 67 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे.
मतदान केंद्रांवर सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.
मनुष्यबळ
मुंबई शहर जिल्हयात 10 विधानसभा मतदार संघ असून एकूण 2537 मतदान केंद्र आहेत. ह्या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे 2537 बीएलओ आहेत. एकूण 364 क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास 12 हजार 500 पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.
मतदारांना आवाहन
प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी, एसएमएस, व्हाट्सअप अशा माध्यमातून संपर्क करण्यात येवून मतदार केंद्राची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment