Wednesday, 2 October 2024

पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार

 पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी

महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानकेंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार

मुंबईदि. 2 : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे.  याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत आज जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळतेयाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोतहे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले आहेत.

00000

   

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi