Saturday, 14 September 2024

ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि. १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी अधिसूचना निर्गमित

 ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि. १६ ऐवजी

१८ सप्टेंबर रोजी अधिसूचना निर्गमित

 

मुंबईदि.१४ : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवारदि.१६ सप्टेंबर२०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर२०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहरमुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवारदि. १८ सप्टेंबर२०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेमुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवारदि.१६ सप्टेंबर२०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवारदि. १८ सप्टेंबर२०२४ या दिवशी जाहीर करण्यात असल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवारदि. १६ सप्टेंबर२०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारदि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi