Tuesday, 17 September 2024

२१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 २१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे

समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 

मुंबईदि. १६ : नागरिकांमध्ये सागरी प्रदूषण विषयी जागृती करणे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि. २१ सप्टेंबर२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू किनाऱ्यावर सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            केंद्रीय वनेपर्यावरणआणि वातावरणीय बदल मंत्रालय व महाराष्ट्र  शासनाच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधीविद्यार्थीयुवा संघटनाराष्ट्रीय छात्र सेनासागरी सुरक्षा दल सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व १३ किनारी राज्यांमध्ये २१ सप्टेंबर२०२४ रोजी (आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस) समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गेल्या 4 वर्षांपासून देशात सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.  तसेच या दिवशी राज्यातील सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi