Thursday, 26 September 2024

तळोजा ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे २८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन - बार कौन्सिल अध्यक्ष संग्राम देसाई

 तळोजा  डव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे

२८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन

बार कौन्सिल अध्यक्ष संग्राम देसाई

 

मुंबईदि. २६ : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने नवी मुंबईतील तळोजा येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन २८ सप्टेंबरला डी.वाय.पाटील विद्यापीठ, नेरूळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण.आर. गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळेमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायउद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नवोदित वकिलांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच कायदा विषयावर संशोधन व्हावेयासाठी अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. तळोजा एमआयडीसी येथे दोन एकर क्षेत्रात ही अकादमी असून ५० हजार चौ. फुट जागेवर इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये ७०० वकिलांना बसता येईल असे सुसज्ज सभागृहतीनशे वकिलांची राहण्याची सोय तसेच १०० ते १५० वकिलांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यासाठी  पाच ते सात वर्ग असणार आहेत. या अकादमीत तरुण वकिलांना ज्येष्ठ वकिलांचे मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यातील सर्व विधी महाविद्यालये या अकादमी सोबत जोडली जाणार आहेत. ही अकादमी महाराष्ट्रगोवादिव-दमण येथील वकिलांसाठी उच्च दर्जाचे कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावण्यात प्रोत्साहन देणार आहेअसेही अध्यक्ष श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. 

या अकादमीत जे विद्यार्थी वकिली क्षेत्रात नवोदित असतील त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सोय असणार आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या या अकादमीसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. भूमीपूजन सोहळ्यास महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफगोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगमबार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आणि उपाध्यक्ष एस. प्रभाकरन आदीही उपस्थित राहणार आहेतअसेही ॲड. देसाई यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेकानंद घाडगे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi