प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.17- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
०००००
वृत्त क्र. 1643
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. 17 : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव, सचिन कावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000
वृत्त क्र. 1642
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
विधान भवनात अभिवादन
मुंबई, दि. 17: केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000
No comments:
Post a Comment