श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या
जमिनी मूळ मालकांना परत करणार
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
हरेगाव मळ्यातील शेतकरी यांनी केलेला दीर्घ कालावधीचा संघर्ष आणि व्यापक जनहित लक्षात घेता, ज्याप्रमाणे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या, त्याप्रमाणे या शेतकऱ्यांना देखील सिलींगच्या मर्यादेपर्यंत जमिनी परत करणे आवश्यक होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. तशी सुधारणा महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमात करण्यात येईल.
No comments:
Post a Comment