सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात
कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पद भरती
मुंबई, दि.३०: सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका (पदसंख्या -०१) या पदावर नेमणूक करण्यात येणार आहे.
या पदाकरिता पात्रता/अटी : अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य). उमेदवार ही मुंबई उपनगर जिल्हयातील मुलींचे वसतिगृहाचे जवळ राहात असल्यास प्राधान्य. शिक्षण - एस.एस.सी. पास. एम.एस.सी.आय.टी. पास व टायपिंग येणा-यास प्राधान्य. मानधन रु. २४४७७/- दरमहा. अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२४. मुलाखतीची तारीख : ०२ सप्टेंबर २०२४. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत असे मेजर प्रांजळ जाधव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी आवाहन केले आहे.
अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी/आजी सैनिक पत्नी असलेल्या प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पत्रव्यवहाराचा पत्ता, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, व्दारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रुझ (पु.), मुंबई-४०००५५. दुरध्वनी : ०२२-३५०८३७१७
No comments:
Post a Comment