Tuesday, 20 August 2024

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणा

 उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील


पूरबाधितांविषयी निर्णय घेणा

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई दि.१९ : उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाहीहे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

            मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ताठाण्याचे जिल्हाधिकारीकोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारीकुळगाव-बदलापूर नगरपरिषदेसह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपूर रेषेशी संबधित ब्ल्यू आणि रेड पूर रेषेचा पुन्हा अभ्यास करावा. बदलापूर शहरातील पूर नियंत्रण आणि भविष्यात नदी पात्राजवळ अतिक्रमण होणार नाहीयाची काळजी घ्यावी. तंत्रशुद्ध अभ्यास करून आणि नागरिकांची भविष्यातील सुरक्षा लक्षात ठेवूनच निर्णय घेण्यात यावा. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन गृहनिर्माण संस्थांना व मूळ जागा मालकांना पुनर्बांधणी करण्यास परवानगी देण्यासाठी त्यानुषंगाने निर्णय घेण्यात येतील.

            या बैठकीत चुकीच्या पूर रेषांची दुरुस्त करणे,  नाल्यापासून अंतर सोडून बांधकामास परवानगी देणेजुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ब्लू लाईनमध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी देणेज्या इमारतीत पूर्वीपासून व्यावसायिक गाळे असतीलअशा इमारतींना रस्त्यापासून एक मीटर उंचीवर व्यावसायिक गाळ्यांना परवानगी देणेब्लू लाईनमधील ज्या भूखंडावर विकास आराखड्‌यात आरक्षण टाकलेले आहे त्यांना शासनाने टीडीआर किंवा आर्थिक भरपाई देणेपूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

            नदीचे खोलीकरणसंरक्षित भिंत बांधणे, आपटी व बॅरेज धरणाला स्वयंचलित दरवाजे बसविणे व पोशीर धरण लवकरात लवकर काम पूर्ण करणे, याविषयी यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi