Friday, 2 August 2024

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

 शाब्बास स्वप्नील’... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

मुख्यमंत्री शिंदेउपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी

 दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

            मुंबईदि. १ : - ‘शाब्बास स्वप्नील’... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेसअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईलअसे जाहीर केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरिसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडेविश्वजित शिंदे यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संपर्क साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीस्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षकआई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यकत्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसहत्याला मार्गदर्शन करणारेप्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीमहाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेमबाजी स्वप्नीलचे हे यश आनंददायी आहे. स्वप्नीलचा महाराष्ट्राला रास्त अभिमान आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आपण राज्यातील विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूप्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीपायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील क्रीडा संकुलांच्या सुविधांचाही विस्तार करत आहोत. ऑलिंपिकहून परतल्यानंतर स्वप्नीलचे महाराष्ट्रात स्वागत आणि यथोचित सत्कार केला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

            ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला कीपुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबीयांसहआईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडेश्री. शिंदे यांचा मोला वाटा आहे.

            या संवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्वप्नील कुसाळेचे आई-वडीलप्रशिक्षकमार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन केले.

०००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi