Saturday, 31 August 2024

नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार

 नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदगाव येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

 

नाशिकदि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : नांदगाव येथील शिवसृष्टीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबरच नांदगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नांदगावजि. नाशिक येथे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजनासर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा येथील कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार किशोर दराडेआमदार सुहास कांदेमाजी खासदार संजय निरुपमसामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष व ते राज्याची अस्मिता आहेत. भारताचा अभिमान आहेत. ते राज्याची श्रद्धा आहेत. नांदगाव शहरात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक प्रकल्प उभारण्यासाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शोभेल अशी शिवसृष्टी तयार झाली आहे. ही शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा ठरेल.  शिवसृष्टीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. 

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याचा महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बहीणींना लाभ झाला आहे. आगामी काळात या योजनेचा निधी वाढविला जाईल. या योजनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. राज्याला विकासकामातून पुढे नेण्यात येत आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमदार श्री. कांदे म्हणाले कीशिवसृष्टीच्या माध्यमातून नांदगावकरांचे स्वप्न साकारले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवसंग्रहालय साकारण्यात येईल. करंजवण पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नांदगावकरिता पाणीपुरवठा योजनाही लवकरच कार्यान्वित होईलअसेही त्यांनी सांगितले. यावेळी बापूसाहेब कवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी गायकदिग्दर्शकसंगीतकार अवधून गुप्तेस्वप्नील बांदोडकरगायिका वैशाली सामंत यांचा गीतसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले.

शिवसृष्टी प्रकल्पाविषयी

नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्ययावत स्मारक उभारण्याची मागणी आमदार श्री. कांदे यांनी केली होती. त्यानुसार चांदवड- मनमाड- नांदगाव- चाळीसगांव जळगाव रस्ताराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ लगत गट क्रमांक २३/अ/२ मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या एक हेक्टर जागेत शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रादेशिक पर्यटन विकास योजनापर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागराज्य शासन तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण चार कामांच्या १२ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच तांत्रिक मान्यता व निविदेची कार्यवाही पूर्ण होऊन सात कोटी रुपये रकमेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात मिनी थिएटर,  ॲम्पी् थिएटरछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रेरणादायी प्रसंग, सभोवताली कारंजे आदि व्यवस्था करण्यात आली आहेत.  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवसृष्टीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi