Saturday, 24 August 2024

पद्म पुरस्कार 2025 करिता नामांकने सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024

 पद्म पुरस्कार 2025 करिता नामांकने सादर करण्याचा

अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024

 

नवी दिल्ली, 23 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला  पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षीही पद्म पुरस्कारांची  नामांकनेकेंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ  झाली असून नामांकने सादर करण्याची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर  2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in).  या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर करता येतील.

 पद्मविभूषणपद्मभूषणआणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असूनकलासाहित्यशिक्षणक्रीडाआरोग्यसामाजिक कार्यविज्ञान आणि अभियांत्रिकीसार्वजनिक सेवानागरी सेवाव्यापारऔद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिकवंशव्यवसायस्तरकिंवा लिंगाचा अपवाद न करताया पुरस्कारांसाठी पात्र आहे.

सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. विशेषत: स्त्रियासमाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीदिव्यांगआणि नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे.

 नामांकने सादर करतानाव्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती 800 शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक आहे. अधिक माहिती गृहमंत्रालयाच्या (https://mha.gov.in) या संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर (https://padmaawards.gov.inउपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi