राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना
३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन
मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजने अंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारेच मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुसार, राज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत त्यांची आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
आतापर्यंत या योजनेतील 17 हजार 350 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे. त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिन्याचे मानधन अदा करण्यात आले होते. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही, लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मानधन मिळाल्यानंतर मोबाईलवर संदेशाच्या रूपाने वेळोवेळी देता येईल, मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही. मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांचीच जबाबदारी आहे, कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करू शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईल वरून किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्यासाठी https://mahakalasanman.org/
आधार पडताळणीसंदर्भात अडचणींसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई कार्यालयातील संपर्क क्रमांक – दूरध्वनी क्र. 022- 228426370, 022- 22043550.
श्रीराम पांडे, सहसंचालक मो. ९४२१६४२६५१, संदीप बलखंडे, सहायक संचालक मो. ९७६३०६८०८३. श्रीमती जयश्री घुगे, कार्यक्रम अधिकारी मो. ९००४११५०८६, श्रीमती अक्षता बिर्जे अधीक्षक मो. ९८६९८३४९४६, श्रीमती पल्लवी कदम, उच्चश्रेणी लघुलेखक मो. ७५०७८७४९३०
पुणे विभागीय कार्यालय - श्रीमती श्वेता पवार, सहायक संचालक, मो. ९०२८९१२८३८. श्रीमती जान्हवी जानकर, अधीक्षक, मो. ९५४५४१४३४३, नरेंद्र तायडे, सहायक लेखा अधिकारी मो.९४२३११४४९९
नागपूर विभागीय कार्यालय - संदीप शेंडे, सहायक संचालक-मो.९४२१७८२८४८, श्रीमती प्रज्ञा पाटील, सहा. लेखा अधिकारी - ८९२८१३०६२२
छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय - संदीप शेंडे, सहायक संचालक- मो.९४२१७८२८४८. सुर्यकांत ढगे, सहा. लेखा अधिकारी-९८२२३३४३२१.
000
No comments:
Post a Comment