वाई नगरपरिषदेतील कर्मचारी बदलीबाबत
शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ३ : वाई (जि. सातारा) नगरपरिषद येथील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे, असे उत्तर मंत्री उदय सामंत यानी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषद येथील कर्मचारी २७ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वाई नगरपरिषद येथील कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल. तसेच ई निविदेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही.
No comments:
Post a Comment