Tuesday, 30 July 2024

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

 तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

 

            मुंबई, दि. 30 : आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे भेट देऊन पाहणी केली.

            यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची विचारपूस करून  वसतिगृहाच्या  स्वच्छता राखण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

            मुलांच्या वसतिगृहातील खोल्यांची, पिण्याचे पाणी व्यवस्था याची प्रत्यक्षात  पाहणी  करून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात याव्या, असे सांगून वसतिगृहाचे  उर्वरित राहिलेलं काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

            यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उच्च व तंत्र शिक्षण मुंबई विभागाचे  सहसंचालक हरिभाऊ शिंदे, सहसंचालक प्रकाश बच्छाव, मातोश्री शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक निलेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi