यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा निविदा प्रक्रिया
अनियमितेबाबत दोषींवर कारवाई होणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ३ : यवतमाळ नगरपरिषदेच्या घनकचरा निविदा प्रक्रिया अनियमितेबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. यामध्ये विधी व न्याय विभागाकडून आलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
याबाबत सदस्य धीरज लिंगाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, यवतमाळ नगरपरिषदेच्या घनकचरा निविदा प्रक्रिया अनियमितेबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर विधी व न्याय विभागाकडून आलेल्या शिफारशी पाहून कार्यवाही करण्यात येईल.
No comments:
Post a Comment