Friday, 5 July 2024

ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर उद्यानाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

 ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या

जागेवर उद्यानाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

- मंत्री उदय सामंत

       मुंबई, दि. ०४ : डहाणू शहरातील मौजे मल्याण येथील जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील दोन इमारती अत्यंत धोकादायक झालेल्या होत्या.या इमारतींच्या शेजारी लोकांची वर्दळ व वास्तव्य असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या  दोन इमारती  डहाणू नगर परिषदेने निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली आहे. या इमारतीच्या जागेवर उद्यान करण्याबाबत प्रस्ताव डहाणू नगरपालिकेने पाठवण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

            याबाबत सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, राजेश पाटील, रईस शेख यांनीही सहभाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, डहाणू नगरपरिषदेने धोकादायक घोषित केलेल्या कोणत्याही मालमत्ता ऐतिहासिक स्वरूपाच्या नसून नगरपरिषद हद्दीतील एकही इमारत ऐतिहासिक इमारतींच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. या सर्व जीर्ण इमारती खासगी मालकीच्या असून घरमालक व भाडेकरूंच्या वादामध्ये या इमारतींची वर्षानुवर्षे दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. डहाणू शहराची मंजूर विकास योजना, अधिनियमातील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषदेने कारवाई केली असल्याचे

मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi