नागपूर शहरातील लहान हॉटेलची तपासणी करणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 : नागपूर शहरात छोटी – छोटी हॉटेल्स सुरू झाली आहेत. काही ठिकाणी पाच – सहा खोल्यांचे मिळून हॉटेल चालविली जात आहे. अशा हॉटेलचा सर्रास व्यवसाय सुरू झालेला आहे. या छोट्या हॉटेलची संपूर्ण तपासणी करून येथील व्यवसायांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अशा हॉटेलना भेटी देण्याची दिनदर्शिका तयार करावी. त्यानुसार नियमित भेटी देवून अशा छोट्या-छोट्या हॉटेलची तपासणी करावी. या ठिकाणी अवैध काम सुरू नसल्याची खात्री पोलिसांनी करावी.
No comments:
Post a Comment