Friday, 12 July 2024

मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 833

मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाजकल्याण अंतर्गत दोन मुलींचे व चार मुलांचे असे एकूण सहा शासकीय वसतिगृह आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याचीभोजनाची मोफत सुविधा असून विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्तास्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

            मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहमुलुंड (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या विद्यार्थ्यांनीकरिता असलेल्या वसतिगृहात १०० विद्यार्थी मंजूर क्षमता असून २० रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- पार्श्वनाथ कॉ.हौ.सो., D-१०,सर्वोदय नगरमुलुंड (पश्चिम) जैन मंदिराजवळमुंबई -८०.

            राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृहकांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात  मंजूर विद्यार्थी क्षमता १०० असून ३० रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- ठाकूर संकुलव्हिडिओकॉन टॉवर समोरकांदिवली (पू) मुंबई-१०१.

               महात्मा ज्योतिराव फुले मुलांचे शासकीय वसतिगृहजोगेश्वरी या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात   १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ३२ रिक्त जागा आहेत.वसतिगृहाचा पत्ता - चांदीवाला कंपाऊंडअक्सा मशीद रोडमिल्लत हॉस्पिटलच्या मागेजोगेश्वरी (प).

            संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहचेंबूर या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ३६ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता - आर.सी. चेंबूरकर मार्गजैन मंदिर समोरबेगर होम कंपाऊंड जवळचेंबूर मुंबई-७१

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहचेंबूर युनिट १ ( विभागीय स्तर) या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात २५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून २५ रिक्त जागा आहेत.वसतिगृहाचा पत्ता - महिला व बालविकास विभाग यांचे शासकीय निवासस्थानआर.सी. चेंबूरकर मार्गसंत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहाजवळजैन मंदिर समोरचेंबूर मुंबई -७१

            माता रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चेंबूर युनिट ४ ( विभागीयस्तर) या विद्यार्थिंनीकरिता असलेल्या वसतिगृहात २५० विद्यार्थी संख्या मंजूर असून ८२ रिक्त जागा आहेत.वसतिगृहाचा पत्ता - आर.सी. चेंबूरकर मार्गजैन मंदिर समोरबेगर होम कंपाऊंड जवळचेंबूर मुंबई-७१. असा आहे, असे  प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi