शासकीय कार्यालयाच्या आवारात
महिला बचतगटांना जागा उपलब्ध करून देणार
महिला बचत गटांच्या उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन
मुंबई, दि.24 : राज्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरातील शासकीय कार्यालयाच्या आवारात बचत गटांना जागा उपलब्ध करुन त्यांच्या उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले.
मंत्रालयात बचतगटांच्या दालनांना शासकीय कार्यालयाच्या आवारात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, ‘मविम’च्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे उपस्थित होते.
मंत्री कु.तटकरे म्हणाले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरांमध्ये महिला बचत गटांच्या उद्योगवाढीसाठी अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शासकीय
कार्यालयांच्या आवारात महिला बचत गटांचे दालन उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
No comments:
Post a Comment