Friday, 5 July 2024

राज्यात कांदा प्रक्रिया उद्योगसंदर्भात कार्यवाही सुरू – पणन मंत्री अब्दुल सत्तार

 राज्यात कांदा प्रक्रिया उद्योगसंदर्भात कार्यवाही सुरू – पणन मंत्री अब्दुल सत्तार

            सन २०२३-२४ मध्ये देशातील कांदा उत्पादनात राज्याचा वाटा ४९.६२ टक्के आहे. सध्या राज्यामध्ये एकूण ६ विकिरण प्रक्रिया केंद्रे आहेत. त्यापैकी ३ विकिरण केंद्रावर कांदा प्रक्रिया करण्यात येते. राज्यातील समृध्दी महामार्गालगत नियोजित औद्योगिक नोडमध्ये ईरॅडिएशन या उच्च तंत्रज्ञानावर आधारित कांदा महाबँककांदा प्रक्रिया व साठवणूकीबाबत प्रकल्प उभारण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण २०२३ अंतर्गत निर्यातीभिमूख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमातंर्गत कांदा प्रक्रियेवर आधारित प्रकल्प प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यासंदर्भात पुढील कार्यवाही उद्योग विभागामार्फत सुरु असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

            रब्बी हंगाम २०२४ करीता दर स्थिरता निधी (PSF) अंतर्गत केंद्रशासनाने ५ लाख टन कांदा खरेदी नाफेड व एन.सी.सी.एफ. या यंत्रणांमार्फत राज्यातील एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे. त्यापैकी १ लाख ७५ हजार टन कांदा खरेदी केला आहे. उर्वरीत खरेदी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi