राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू
मुंबई दि.4: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.
राज्यातील एकूण 48 मतदार संघासाठी 39 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे.
No comments:
Post a Comment