*नवीन पुस्तकं.......*
*द आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो......*
लेखक:- डेमन झहरियादेस
अनुवाद:- विशाखा कुलकर्णी
पाने:- 192
किंमत:- 250/-
सवलतीत:- 225/-(कुरिअर चार्जेससह)
आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो हे डेमन झहरियादेस यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. एखादं काम आपल्याला मनापासून आवडत असेल तर ते करताना आपण अगदी रंगून जातो. तल्लीनतेची उच्च पातळी गाठतो. त्यावेळी आजूबाजूचा परिसर, वेळ, सोयीसुविधांचा अभाव, अशा अनेक गोष्टींचा विसर पडतो. मनात इतर विचार किंवा भावनांचे कल्लोळ नसतात. फक्त आपण स्वतः आणि ती कृती असे एकमेकांशी जोडलेले असतो. एका छान लयीत ती कृती चालू असते.
अशावेळी आपली सर्वोच्च क्षमता वापरली जाते. आपल्या हातून अतिशय सुंदर निर्मिती होते. गायक, चित्रकार, नृत्यांगना, शिल्पकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, अशा व्यक्तींना हा अनुभव येतोच. सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा कधी कधी हा अनुभव घेतात. त्या तल्लीनतेतून बाहेर आल्यावर आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं की हे सगळं कसं काय झालं? असं अत्युच्च काम विक्रमी वेळेत पुन्हा करता येईल का? प्रत्येक गोष्टीत ही तल्लीनता मिळवता येईल का? अगदी निश्चितपणे," हो, मिळवता येईल" असं याचं उत्तर आहे. लेखकाच्या स्वअभ्यास व स्वानुभवातून आलेलं हे सकारात्मक उत्तर आहे. आपल्या इच्छेनुसार फ्लो झोनमध्ये प्रवेश कसा करावा, तो टिकवून कसा ठेवावा याचं तपशीलवार मार्गदर्शन हे पुस्तक करतं. संपूर्ण क्षमतेनं, थकवा न जाणवता, अलौकिक आनंद मिळवत काम करण्याचा अनुभव आपल्या इच्छेनुसार घ्यायचा असेल तर या पुस्तकात दिलेले स्वाध्याय नक्की पूर्ण करा. त्यासाठी हे पुस्तक आपल्या संग्रही असणं आवश्यक आहे.
*या पुस्तकात...*
*• मनाची फ्लो स्टेट आणि त्याचे आश्चर्य वाटावे असे परिणाम.*
*• चार ट्रिगर्स जे फ्लो स्टेट मिळवून देतात.*
*• 'फ्लो'चे आठ शत्रू आणि त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा ?*
*• फ्लो स्थितीमध्ये जाण्यासाठी सविस्तर ॲक्शनप्लॅन.*
*• आपण फ्लो स्टेटमध्ये आहोत हे कसे ओळखावे ?*
*• फ्लो स्थितीत गेल्यानंतर ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी पाच युक्त्या*
*• फ्लो स्टेटची संभाव्य गडद बाजू (त्यावर नियंत्रण कसं ठेवावं.)*
*(कृपया पोस्ट शेअर करावी हि विनंती.........)*
No comments:
Post a Comment