Wednesday, 26 June 2024

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा

 निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा  

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांची भेट

 

            मुंबईदि. २६ : जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (PMKSY-AIBP) योजनेत होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली.

            निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई  योजनेत होण्याबाबतच्या प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने (CWC) इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स (Investment Clearance) दिलेले होते. असून या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश या योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली आहे. आज झालेल्या बैठकीत याविषयी सकारात्मक चर्चा झाली. निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही पूर्ण करून (PMKSY-AIBP) या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश मंत्री सी. आर. पाटील यांनी विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले.

            या बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जीजलसंधारण विभागाच्या सचिव  विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त  ए. एस. गोयल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi