Wednesday, 12 June 2024

तारळी प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना 10 ऑगस्ट पूर्वी कार्यान्वित करावी

 तारळी प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना

10 ऑगस्ट पूर्वी कार्यान्वित करावी

- मंत्री शंभुराज देसाई

            मुंबईदि. 12 : सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तारळेबांबवडे उपसा सिंचन योजनांमध्ये जुने सदोष यांत्रिक साहित्य बदलवून अद्ययावत पाणी उपसा करणारी  यंत्रणा बसवावी. या उपसा सिंचन योजनेचे प्रात्यक्षिक घेवून ही योजना 10 ऑगस्ट 2024 पूर्वी कार्यान्वित करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

               मंत्रालयात तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनामोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील नाटोशी उपसा सिंचन योजना व केरा मणदुरे विभागातील निवकणेचिटेघर व बिबी प्रकल्पाबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेमुख्य अभियंता श्री. धुमाळ सहभागी झाले होते.

            मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पांतर्गत नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा आढावा घेत मंत्री श्री. देसाई म्हणालेया योजनेचे बंद पाईप लाईनचे काम सुरू करावे. ही योजना पूर्ण झाल्यास पाटण तालुक्यातील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तारळी पॅटर्नप्रमाणे केरा मणदुरे विभागातील निवकणेचिटेघर व बिबी या प्रकल्पातील दोन्ही तीरावरील शेत जमिनीस उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे. सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. निवकणे उपसा सिंचनाची उंची न वाढवता आहे त्याच स्थितीत कामे करण्यात यावीतअसे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

              तराळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी महावितरणने या भागातील भारनियमन काही दिवसांसाठी रद्द करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी महावितरणला दिल्या. सर्व योजना पूर्ण क्षमतेने एकाच वेळी सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi