Wednesday, 22 May 2024

"भले बुरे जे घडून गेले* *विसरून जाऊ सारे मणभर

 *"भले बुरे जे घडून गेले* 

 *विसरून जाऊ सारे मणभर* *जरा विसावू या वळणावर. या* *वळणावर* .............

किती सुंदर अर्थ या शब्दांमध्ये दडला आहे.

"मला नेहमी एक गाणं ऐकायला फार आवडतं, त्याची सुरुवात सुद्धा खूप छान आहे, ती म्हणजे,

 या गाण्यातील शब्दाप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात भुतकाळात जे काही भले बुरे घडून गेले असेल ते विसरन्याचा प्रयत्न करायला हवा. चांगले घडले किंवा वाईट घडले तरीही या दोन्ही गोष्टींना खुप कवटाळून न बसता आपण आपला हा प्रवास 'स्थितप्रज्ञ राहुन पूर्ण करायला हवा. आयुष्यात तर आपण या दोन्हीही परिस्थितीत स्वतःला स्थिर, आनंदी ठेवण्याचा सराव आपण करायलाच हवा.

आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कवटाळून बसू नका

आपल्या आयुष्यात एखादी मनाच्या विरुद्ध अनपेक्षित अशी घटना घडली की, आपण तिला एवढं कवटाळून बसत आहोत की, आपण तिला सहजरित्या आपल्या मनातून काढूच शकत नाहीत, मित्रांनो, आपलं आयुष्य खरंच खूप मोठं नाहीये. अशा प्रकारच्या मनाला न आवडणाऱ्या अनेक घटनांचा सामना आप- ल्याला करावाच लागणार आहे. अशा घटनांना सामोरे जाण्याचा सरावच आपण केला पाहिजे, मी हे मान्य करतो की, आपण ए- खाद्या गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आपला खूप अनमोल असा वेळ त्यासाठी दिलेला असतो, तसेच अनेक लोकांच्या अपेक्षासुद्धा आपल्याकडुन असतात, तरीही आपण अपयशी झालोच तर त्याला खुप कवटाळून बसू नका; विनाकारण खूप त्रास होतो. मित्रांनो, कोणतंही यश हे अंतिम यश नसतं, अगदी याचप्रमाणे कोणतंही अपयशसुद्धा अंतिम अपयश नसतं. यशा- नंतर अपयश आणि अपयशानंतर यश ही निरंतर चालणारी साखळी आहे. यांकडे आपल्याला खूप प्रगल्भतेने पाहायला शिकण्याची ही सवयच लावावी लागणार आहे. म्हणुनच आजपासून आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याच घटनांना खूप जास्त कवटाळून बसू नका. या गोष्टी सहज सोडून देण्याची सवय आपल्याला लागायला हवी.🙏🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi