Monday, 6 May 2024

निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

 निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

-जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

मुंबई उपनगरदि. 5 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतलायावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक धनंजयसिंह भदोरियासंजयकुमार खत्रीस्तुती चरणपरवीनकुमार थिंडकेंद्रीय पोलिस निरीक्षक गौरव शर्माप्रीती प्रियदर्शनीकेंद्रीय खर्च निरीक्षक नेहा चौधरीदीपेंद्रकुमारराजकुमार चंदनकिरण छत्रपतीसुनील यादवसुरजकुमार गुप्तापोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरीअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरेवंदना सूर्यवंशीडॉ दादाराव दातकरसोनाली मुळेउपजिल्हाधिकारी (निवडणूकतेजस समेळ तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होतेयावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीक्षीरसागर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.

वाहने तपासणी  फिनटेक आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

विविध तपासणी पथकांच्या माध्यमातून वाहनांची तसेच फिनटेक  माध्यमातून  होणाऱ्या पैश्यांच्या व्यवहारांचीही कसून तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीक्षीरसागर यांनी सांगितलेकायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विविध ठिकाणी नाकबंदी वाढविण्यात येत असल्याचे पोलिस सहआयुक्त श्रीचौधरी यांनी सांगितले.

निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

मतदान केंद्रेटोल फ्री क्रमांकमतदारांसाठीच्या सुविधाकर्मचारी प्रशिक्षणवेल्फेअर ऑफिसरआदर्श आचारसंहिताईव्हीएम मशीनकायदा - सुव्यवस्थाखर्च संनियंत्रणमतदार जागृती अभियान (स्वीप), जाहिरात प्रमाणीकरणआपत्कालीन परिस्थितीतील नियोजन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.

तयारी संदर्भात निरीक्षक समाधानी

            मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi