1 मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आज *कर्मचारी संघटना अखिल भारतीय भौतिक एवं पुनर्वसन संस्थांन मुंबई च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन ! ___________
या कार्यक्रमास संस्थेचे निदेशक डाॅ. अनिल कुमार गौड हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते तर
काॅ. संतोष नायर जनरल सेक्रेटरी COC, मुंबई,
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी अँड. विजय धर्मराज रणदिवे,
काॅ. दिनेश हंसराज देढिया, माजी अध्यक्ष,अखिल भारतीय पोस्ट एम्प्लॉईज युनियन हे प्रमुख पाहुणे व विविध सरकारी कर्मचारी संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
त्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. अमरदीप शिरसाट यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात काॅ. अमरदीप शिरसाट यांनी कामगार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात 2022 पासून जे महत्त्वपूर्ण बदल झालेत, ऊदा. जुुनी पेंशन योजना व नवीन पेंशन योजना, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अनुशासनिक कारवाई, इत्यादींबद्दल ॲड विजय रणदिवे यांनी
तर श्री दिनेश देढिया यांनी लिव्ह रूल्स, मेडिकल बिल, एलटीसी, टैक्स डिडक्शन इत्यादी महत्वपूर्ण विषयां बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निदेशक
डाॅ. अनिल कुमार गौड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मचारी, कर्मचारी संघटना व ऊपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पदाधिकाऱ्यांचे स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. संघटनेचे सचिव काॅ. सुनील आळवे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यात योगेश घरत,मनोज माने,सुजय मोरे,रविराज रहाटे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment