Monday, 15 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी संजय दैने यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. १४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

       जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था  कार्यवाहीमाध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत  श्री. दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने  यांची मुलाखत मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. 

0000

 

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi