Thursday, 18 April 2024

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ वार्तापत्र, दि. १८ एप्रिल २०२४

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

वार्तापत्रदि१८ एप्रिल २०२४

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

 

 मुंबईदि.१८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ (First Randomization) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत आज झाली.

           यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडउपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसूंदर सुरवसेउपजिल्हाधिकारी तथा इव्हीएम व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी महादेव किरवले यांच्यासह सर्व राष्ट्रीय व राज्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे आमंत्रित केलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

             प्रारंभी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रीयेबाबत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. यादव यावेळी म्हणालेलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या १० मतदारसंघांचा समावेश असून २ हजार ५१७  मतदान केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ मतदारसंघनिहाय करण्यात आली. प्रथमस्तरीय तपासणीनंतर जिल्ह्यात मतदानासाठी उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस प्रणालीद्वारे प्रथम सरमिसळ करण्यात आली.

           याद्वारे एकूण ३ हजार १६  बॅलेट युनिट (बीयु)३ हजार १६  कंट्रोल युनिट (सीयु) आणि  ३ हजार २६८ व्हीव्हीपॅट मशीनचे जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांच्या प्रमाणात सरमिसळ करण्यात आली.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi