वर एक *बाटली* आणि एक *बाटला* दिसत आहे.
*यांची वैशिष्ट्ये*
*बाटली ७५० एम् एल् ची आहे तर बाटला १४.५० किलोचा आहे.*
*७५० एम्एल्* च्या बाटलीची किंमत साधारण *१३०० रूपये* आहे.
तर *१४.५ किलोच्या बाटल्याची किंमत ९०० रूपये आहे*
*१३०० रुपयांची* ही *बाटली* तीन माणसांमध्ये दोन तासात रिकामी होते.....
तर *९०० रुपयांचा* बाटला संपवायला तीन माणसांना साधारण *४०* दिवस लागतात......
विषेश म्हणजे *१३०० रुपयांची बाटली* दोन तासात रिकामी करताना ते तीघे त्या *९०० रुपयांच्या बाटल्याच्या* नावानी गळे काढत असतात.
आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या संपूर्ण देशात त्या *९०० रुपयांच्या बाटल्याचा* जितका खप होतो त्याच्या तीनपट त्या *१३०० रुपयांच्या बाटलीचा* खप केवळ महाराष्ट्रात होतो.
त्या *बाटलीची किंमत* उद्या जर *२००० रुपये* झाली तरी त्याविरोधात कोणही कोणतीही बोंबाबोंब करणार नाही.
पण तो *बाटला* जर *९०० रुपयांवरून ९५० रुपये* झाला तर मात्र सर्वत्र गदारोळ माजवला जातो.
*एक वास्तव*
No comments:
Post a Comment