Tuesday, 5 March 2024

बाराखडी*

 🙏🏻

*बोधकथा*      

                       *बाराखडी*             


*प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात*


*तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो..*


*एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.* 


*नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे. हा दिनक्रम रोजचाच झाला होता.*


*देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली.*


*त्यांना वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !*


*असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली.* 


*एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले. तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,* 


*मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ? ती एकदम म्हणाली*


*" प्रार्थना "* 


*पुजारी यांनी जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते ?* 


*" नाही " असे ती म्हणाली.*


*मग तू डोळे मिटून रोज काय करते ? असे त्यांनी हसून विचारले.* 


*अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही "*


*अ, आ,इ, ई  पासून  ज्ञ  पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या बाराखडी च्या बाहेर असूच शकत नाही.*  


*ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना !!.* 


*ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होई पर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभे राहिले.* 


*ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा...!!*


*अगा बावन्न वर्णा परता।*

 *कोण मंत्रु आहे पांडुसूता।।*


*c/p ज्ञानेश्वरी*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi