Tuesday, 12 March 2024

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यातील जमिनीचे अडथळे दूर करावेत

 धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यातील

जमिनीचे अडथळे दूर करावेत

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई दि. ११ : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील आवश्यक जागा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जागेवर वसतिगृह उभारण्यातील जमीन प्रश्नाबाबत येणारे अडथळे दूर करावेतअशा सूचना महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

            नाशिकच्या मंजूर जागेवर वसतिगृह उभारण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झालेल्या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकरपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढेइतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलदुग्ध विकास आयुक्त पी.पी.मोहोड आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले कीवसतिगृहासाठी शासनाने यापूर्वीच जमीन उपलब्ध करून दिली आहे.दुग्धव्यवसाय विकास विभाग व संबंधित विभाग समन्वयाने कार्यवाही करावी. उपलब्ध जागेच्या प्रश्नासंदर्भात अडथळे दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी समाजाची मागणी विचारात घेतली असून याप्रश्नी सकारात्मक भूमिका असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            आमदार श्री.पडळकर व संबंधित प्रतिनिधींनी या कामातील अडथळे व सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत म्हणणे सादर केले. धनगर समाजाच्या मुले व मुलीसाठी वसतिगृहाच्या इमारत उभारण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारीतील जागानियोजन व कार्यवाहीबाबत प्रधान सचिव श्री मुंडेप्रधान सचिव श्रीमती सिंगलआयुक्त श्री. मोहोड आणि नाशिक जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अश्विनी यमगरउपायुक्त श्री.शिरपूरकरराजेश निकनवरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी तसेच किरण थोरातनीलेश हाके हे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi