Friday, 8 March 2024

राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आदितीताई तटकरे यांचे केले विशेष अभिनंदन

                                                          

            मुंबईदि. 8 :- यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जानवी उमेदनवं बळ दिलं आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्यमहिलांना पोषक आहारमहिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धीमहिलांची सुरक्षामहिलांसाठी रोजगारनिर्मितीनिर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभागमहिला खेळाडूंना आर्थिक सहाय्यसांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिकसांस्कृतिकआर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीत्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समितीजिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्कसंवादसमन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईलमहिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

            राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्वक्षेत्रात समान संधीशासन-प्रशासनात योग्य स्थानअर्थसंकल्पात योग्य तरतूदरोजगार-स्वयंरोजगारात समान संधीकौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणसंपत्तीत समान वाटाउद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठआरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.  निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावीअसा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या जागतिक महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००००

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi