Thursday, 14 March 2024

पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेमुळे पशुपालक ते उद्योजक होण्यास संधी

 पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेमुळे

पशुपालक ते उद्योजक होण्यास संधी

- सचिव तुकाराम मुंढे

'दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष मुलाखत

            मुंबईदि. 14 : राज्य शासनाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकरी तसेच पशुपालकांना पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती होऊन उद्योजक होण्यास संधी उपलब्ध होणार असल्याचेपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सांगितले आहे.

            पशुपालन व दुग्धव्यवसाय हा कृषीपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण करुन पुनर्रचनेनंतर "आयुक्तपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय" असे नामाभिधान करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            या बदलामुळे शेतकरीपशुपालक व दुग्धव्यवसायिक यांच्या समोरील आव्हाने विचारात घेवून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उद्योजकतेच्या दिशेने होण्यासाठी चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती साधणे तसेच पशुपालक ते उद्योजक होण्यासाठी मिळणारा लाभयाबाबत सचिव श्री.मुंढे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  'दिलखुलासकार्यक्रमात श्री. मुंढे यांची मुलाखत शुक्रवार दि. 15आणि शनिवार दि.16 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 15 मार्च 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi