Friday, 1 March 2024

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्यावा

 इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी

तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्यावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 1 : इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावेयासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफगृहनिर्माण मंत्री अतुल सावेखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेआमदार प्रकाश आवाडेआमदार सतेज पाटीलआमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरप्रकाश आबिटकरमाजी खासदार राजू शेट्टीमाजी आमदार सुरेश हाळवणकरसंजय घाटगेजिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटेमाजी नगराध्यक्ष अलका स्वामीयांच्यासह कृती समितीचे शिष्टमंडळजलसंपदा विभागमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

            इचलकरंजी महानगरपालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे. परंतु येथून पाणी देण्यास विरोध असल्याने यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आज बैठक झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीइचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. हे पाणी देताना कोणाचेही पाणी हिरावून घेतले जाणार नाही. या विषयावर मध्यममार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. यामध्ये कृती समितीचे प्रतिनिधीजलसंपदामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणमहानगपालिकेचे अधिकारी तसेच तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करावा. या समितीने सर्वांची बाजू व सूचना ऐकून घ्याव्यात व तांत्रिक अभ्यास करून एक महिन्यात अहवाल सादर करावा.

            यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी व कृति समितीच्या सदस्यांनी बाजू मांडली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi