Thursday, 8 February 2024

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक

पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

            - पालकमंत्री संजय राठोड

            मुंबई‍‍दि. ८ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या बसस्थानकाची पुनर्बांधणीची कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

            मंत्रालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रलंबित विषयाबाबत बैठक झाली.

             पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले कीदिग्रस आणि दारव्हा येथील अत्याधुनिक बसस्थानकांमुळे नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार आहे. या बसस्थानकातील विद्युत व्यवस्थापेव्हर ब्लॉककाँक्रिटीकरणवाहनचालक विश्रांतीगृह या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी दिल्या.

            एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतबसस्थानक निधीजादा बसेस मिळणे या विषयाबाबतही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.

                या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरपरिवहन विभागाचे सहसचिव श्री. होळकरपरिवहन विभागाचे महाव्यवस्थापक श्री.बरसट तसेच परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi