Friday, 2 February 2024

दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान

 दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना

स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान

 

            मुंबईदि. 2 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योगकामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण आज प्रदान करण्यात आले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघलउपसचिव स्वप्नील कापडणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवारदादासाहेब खताळदीपक पोकळेअवर सचिव बाबासाहेब शिंदेकक्ष अधिकारी राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi