Thursday, 29 February 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण

 

            मुंबईदि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणेठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

            कोपरन रिसर्च लॅबोरेटरीजसँडोज प्रायव्हेट लिमीटेड,  एमेरिकेअर्स  इंडिया फाऊंडेशन यांच्यावतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

            साहित्य वितरण व उद्घाटन प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार भरत गोगावले  उपस्थित होते. प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे  कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळीसोसायट्या यामधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहचविण्यात येणार आहे. यासाठी मुंबईठाणेरायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळेको-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणेपिंपरी-चिंचवड एकूण ७९ संचरायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडीमहाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. आठवीनववीदहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी एचटीएमएल व कोडिंगचे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोलीउंबरेता.खालापूरबिरवाडीता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदेसमन्वयक मनोज घोडे-पाटीलसतिश जाधव आदींनी केले.

            कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणीवरूण सोमाणीअजित जैनराकेश दोशीसंजय दोशीसुनील सोधानीललित राजपुरोहीतश्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारेसमीर कोरेपंकज गुप्तेअजित जांभळेलुसी दास यांच्यासहस अमेरिकाकेअरचे अनिर्बण मित्राअशोक राणागुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते. तसेच या सर्व कामात सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वाशिमच्या अस्मिता मल्टीपर्पज एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज भगतवैशाली भगतस्वराज्य सेवा वाघमोडे प्रतिष्ठानच्या डॉ. राजकुमार वाघमोडेअक्षय पाटील यांच्यासह  सावरोलीचे सरपंच संतोष  बैलमारेखोपोलीच्या वायएके पब्लिक स्कुलच्या उपप्राचार्या पूनम गुप्ता सहकार देवगिरी फाऊंडेशनचे अनंत अंतरकरडॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

0000


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi