Sunday, 18 February 2024

गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी

 

गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य

शासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी वितरित

 - मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. १८ :  वाराणशीहृषीकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या "गोदा आरती" उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला. 

            ही कार्यवाही  जलद गतीने व्हावी यासाठी एक स्थानिक समिती गठित करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या.  दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी गोदा आरती प्रस्तावाची आढावा बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत दिलेल्या सूचनांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेतला होता.

            जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक शासनास सादर केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ६ फेब्रुवारी रोजी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी "आझादी का अमृत महोत्सव कोअर समिती"ची बैठक आयोजित करून गोदा आरती सुरू करण्यासाठीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली होती.

            जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तत्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदा आरती साठी आवश्यक पायाभूत सोई सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            पायाभूत सोयींसाठी मागितलेला निधी उपलब्ध झाल्याने गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफार्म तयार करणेभाविकांना बसण्यासाठी गॅलरीहायमास्टतसेच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामे वेगाने करण्यात येतीलअसे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi