Tuesday, 6 February 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशात उभे केलेले काम, त्या अनुषंगाने मुंबईसह महाराष्ट्राचा झालेला विकास याची माहिती घरोघरी जाऊन लोकांपर्यंत

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशात उभे केलेले काम, त्या अनुषंगाने मुंबईसह महाराष्ट्राचा झालेला विकास याची माहिती घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘घर घर चलो अभियान’च्या माध्यमातून करणार असल्याची माहिती भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात अशोकनगर, दामोदरवाडी येथून आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घर घर चलो अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार भातखळकर म्हणाले, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कमगिरी, राज्यात तसेच विशेष करून मुंबईमध्ये राबवण्यात आलेल्या विकासाच्या योजना, जगभरात भारतीय संस्कृतीचा वाजत असणारा डंका याचे विवरण आम्ही संपूर्ण विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन करणार असल्याचे ते म्हणाले.

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात पुढचा आठवडाभर हे अभियान राबवण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार आहेत. 

Regard's

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi