Sunday, 14 January 2024

उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले..!' ठाण्यात संगीतमय कारंजे आणि घाटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले लोकार्पण

 'उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले..!'

ठाण्यात संगीतमय कारंजे आणि घाटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले लोकार्पण

 

    ठाणेदि.13 : ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतूनठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे 'वॉटर स्क्रीन'सह आहेत. त्यावरदाखविण्यासाठी मराठीहिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. त्यांचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिरअसे या शोंचे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर करण्यात आले. 

     याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदेआमदार प्रताप सरनाईकज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवालमाजी आमदार रवींद्र फाटकमाजी नगरसेविका परिषा सरनाईकआशा डोंगरेजयश्री डेव्हिडमाजी नगरसेवक पूर्वेश सरनाईकमहापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

       ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहेरस्ते अधिक चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छसुंदर आणि निरोगी करायचे आहेअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायलाफिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार प्रताप सरनाईक यांना असे कारंजे ठाण्यात करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवलेअसेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले. तसेचयेथील शो विनामूल्य ठेवावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.

      मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघालाठाण्याला भरभरुन दिले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. अशी आणखी दोन संगीतमय कारंजी लवकरच सुरू होतीलअशी माहिती आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिली. याच कार्यक्रमातचित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्री यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा तसेचसंदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi