पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे सर्व जिल्ह्यात आयोजन करणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पारंपरिक मैदानी खेळाला पुनर्जीवित करून त्याला उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेसाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या स्पर्धासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही राज्य शासनामार्फत मार्फत करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना चांगले बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम आपण सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० महोत्सव राज्यभर साजरा केला जात आहे. एक वेगळीच जोड आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण करून दिली आहे,ती कौतुकास्पद बाब आहे. राज्यातील गड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी व त्याविषयी माहिती होण्यासाठी गड किल्ल्याचे प्रदर्शन भरवले जात आहे.ही खरी शिवाजी महाराजांची आठवण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाला प्रोत्साहन दिले आहे. आपल्या राज्याला लाल मातीची परंपरा आहे. खेळाडूंना आपला साहस दाखवण्यासाठी त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. खेळाडूंना पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला लेझीमच्या गजरात राज्यपालांनी मशाल पेटवून महाकुंभाचे उदघाटन केले. राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगर पालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
0000
No comments:
Post a Comment