Friday, 19 January 2024

भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त काव्य स्पर्धा

  भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त काव्य स्पर्धा

 

            नवी दिल्ली, 18: ‘शिवनेरी, फुलपाखरू, शेतकऱ्यांचे हाल, मी तुम्हाला कळलो नाही’, आयुष्यमैत्रीक्षणसभा पक्ष्यांची,  आई आई करना गं भेळ …,’ अशा सुंदर कविता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

       मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत चौगुले पब्लिक शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मराठी व हिंदी भाषिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून कविता सादर केल्या. प्रथम तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

       चौगुले पब्लिक शाळेच्या प्राचार्य पूजा साल्पेकर व इतर शिक्ष‍कांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

             या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होत्या.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi