Tuesday, 30 January 2024

३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण

 कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी

३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन

मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांची माहिती

            मुंबईदि. २९ : मुंबई शहर जिल्ह्याच्या विविध शासकीयनिमशासकीय कार्यालयांमध्ये आढळून आलेल्या कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा प्रवर्गाच्या अभिलेख्यांची व्यक्तीनिहाय यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीमध्ये समाविष्ट व्यक्ती तसेच आवश्यक पुरावे सादर करणारे अर्जदार नियमानुसार पात्र ठरत असल्यासअशा व्यक्तींचे जात प्रमाणपत्र संदर्भातील अर्ज भरुन घेणेते स्वीकारण्यासाठी ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत विशेष शिबिर होणार आहेअसे मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे (सा. प्र.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

            हे शिबिर जिल्हास्तरीय आपले सरकार सेवा केंद्रजिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारओल्ड कस्टम हाऊसशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई येथे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ९ वॉर्डमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात होईल.

            मा. न्यायमूर्ती शिंदे समिती (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध जिल्ह्यांत आढळून आलेल्या कुणबी नोंदीसंदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने १८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा या प्रवर्गातील नागरिकांनी आपल्याकडील उपलब्ध पुराव्यांसह शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारीमुंबई शहर यांनी केले आहे.

            विशेष कक्ष स्थापन केलेल्या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक असे (अनुक्रमे कार्यालयाचे नाव/बृहन्मुंबई वॉर्डपत्ताआपले सरकार केंद्र चालकाचे नावमोबाईल क्रमांक या क्रमाने) : जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरतळमजलाओल्ड कस्टम हाऊसशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबईनीलेश बापूसाहेब माने- देशमुख९७६९२४१३१४. ’ वॉर्ड१३४ ईशहीद भगतसिंग मार्गरिझर्व्ह बँकेजवळफोर्टमुंबईप्रभू हिरा राठोड९७६८०५७१८०. बी’ वॉर्ड१२१रामचंद्र भट मार्गसर ज. जी. रुग्णालयासमोरमुंबईसुधीर रमाकांत चिंबूलकर९००४३५२१३४. सी’ वॉर्ड७६श्रीकांत पालेकर मार्गचंदनवाडी स्मशानभूमीजवळमुंबईमहेश नथुराम साळवी९८७०८७७५३३. डी’ वॉर्डजोबनपुत्र कम्पाऊंडनाना चौकमुंबईऋग्वेद रवींद्र खांडेकर (९९६७०२१५२२)प्रथमेश प्रकाश राऊत (९८९२००२१७०). ’ वॉर्ड१०शेख हफिजुद्दीन मार्गभायखळामुंबईयश एन्टरप्रायजेस (९७०२२८९७६४)परवेझ अहमद अन्सारी (९८२१३८७९१८). एफ’ नॉर्थप्लॉट क्रमांक ९६भाऊ दाजी रोडकिंग्ज सर्कलमाटुंगा पूर्वमुंबई,


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi