Wednesday, 3 January 2024

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 

               सातारा, दि. ३ :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळउत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईइतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरआमदार सर्वश्री मकरंद पाटीलजयकुमार गोरेमहेश शिंदे आदी उपस्थित होते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पण

         




   ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            या सभागृहाच्या नूतनीकरणाअंतर्गत स्थापत्य कामांसाठी आणि विद्युतीकरणासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेतअशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi