Wednesday, 24 January 2024

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत

 दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 

            मुंबईदि. 24 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज सकाळी झाली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

             याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ताविशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळीपोलीस उपयुक्त मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

              आज झालेल्या रंगीत तालमीत भारतीय नौदलगोवा पोलीस पथकराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलगडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथकगृहरक्षक दल पुरुष व महिला,  बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलराज्य उत्पादन शुल्क पथकवनरक्षक दलमुंबई अग्निशामक दलमुंबई महानगरपालिका सुरक्षा दलठाणे व मुंबई शहरउपनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पथकराष्ट्रीय सेवा योजनासी कॅटेगरी प्राप्त एनएसएस पथकभारत स्काऊट गाइड मुले व मुलींचे पथकपोलीस ब्रास बॅण्डराज्य राखीव पोलीस बलाचे पाइप बॅण्ड पथकबृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटार सायकल पथकनिर्भया वाहन पथकनौदलाच्या पी -21आर -61 मिसाईलयांच्यासह अन्य विभाग,  शाळांच्या सहभाग घेतला.

तसेचराज्य शासनाच्या 18 विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह तालमीत सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 1 मे 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथकास प्रथमबृहन्मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक द्वितीय तर बृहन्मुंबई महिला पोलीस बलास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi