Tuesday, 9 January 2024

लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

 लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

- कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी

मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन

            मुंबईदि.९ : मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितले.

            कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग (SEEID), व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड येथे मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे  उद्घाटन आयुक्त श्रीमती चौधरी यांच्या हस्ते झाले.

            यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवीमहाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजनइक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रालाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.

             आयुक्त श्रीमती चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतीना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१  व्या शतकातील  आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो.

            श्री. दळवी म्हणालेगेल्या वर्षी लाइटहाऊस प्रकल्प सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झाला आणि आज या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. आय. टी. आय.मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित जीवनात लागणारी कौशल्य विकसित होतील.

            डॉ. नटराजन म्हणाले की, लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून २०३० पर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखों युवक-युवतींचे जीवन बदलण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.

            श्री.मुंद्रा म्हणाले की, "लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनने देशात विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबईत या उपक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.  ही अभिमानाची गोष्ट आहे.

            शेफाली शिरसेकर आणि वैभव कोल्हे यांनी प्रस्ताविक केले. लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी आभार मानले.

लाइटहाउसच्या माध्यमातून रोजगार क्षमता वाढेल

            कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागव्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड येथे हा प्रकल्प सुरु झाला आहे. लाइटहाऊस प्रकल्प आय.टी.आयमुलुंड येथे ३००० चौरस फूट क्षेत्रात  उभारण्यात आलेला आहे. यामध्ये विविध वर्ग खोल्या तयार करण्यात केल्या आहेत. यामध्येखजानाकट्टाटेक- हब  आणि क्लासरूम असून या प्रकल्पामार्फत युवकांना विविध कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास विकासावर भर देण्यात येतो. मुलुंड लाइटहाऊसमध्ये कमी उत्पन्न समुदायातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना माहितीकरिअर समुपदेशनव्यावसायिक कौशल्ये देण्यात येत असूननोकरी मिळवण्यासाठी आणि नंतरचेही सहकार्य करण्यात येत आहे. याद्वारे त्यांना उपजीविका करता येईल. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांची रचना करताना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा समावेश केला जाईल. ज्यामुळे तरुणांची रोजगारक्षमता वाढेल. लाइटहाऊस कार्यक्रम हा भारतामध्ये  ४ राज्यांमध्ये आणि १० शहरांमध्ये सुरू आहे. लाइटहाउस प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागिदारी (PPP) द्वारे चालवले जातात. ज्यामध्ये सरकारी संस्थाकॉर्पोरेट्ससामाजिक संस्था आणि नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी काम करतात.

                              लाइटहाऊस  कम्युनिटीज फाऊंडेशन बद्दल

            लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हे संपूर्ण भारतातील एक दशलक्ष वंचित तरुणांसाठी जीवन-कौशल्यरोजगार आणि उद्योजकता यांच्या संधी निर्माण करून एक सक्षम समाज निर्मिती करण्याच्या मोहिमेवर आहे. ही संस्था 2015 पासून एका वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक-खासगी भागिदारीतून मोठ्या प्रमाणावर परिवर्तनासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना याचा लाभ झाला आहे आणि 2030 पर्यंत 10 लाखाचा आकडा गाठण्याचे ध्येय ठेवले आहे.

इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड

             इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड ही  एक बीएसई आणि एनएसई यादीत असलेलेमुंबईस्थित भारतीय आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग  बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 


 

वृत्त क्र. 91

सुधारित :

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi