Saturday, 9 December 2023

जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी

 जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी

               उपमुख्यमंत्री अजित पवार

            नागपूरदि. 8 :- केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत सुरू असलेली कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत. यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावातील त्रुटी दूर करून सादर कराव्यातअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानभवनातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील जल जीवन मिशनमधील योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील आढावा घेतला. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलआमदार सर्वश्री किरण लहामटेदेवेंद्र भुयारराजू कारेमोरेइंद्रनील नाईकमनोहर चंद्रिकापुरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णामुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीघरगुती नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. या योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्रुटी राहिल्या असतीलतर त्या दुरुस्त करून प्रस्ताव सादर करावेत. वित्तनियोजन आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे आढावा घ्यावाअशाही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

            पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले कीराज्यात सन 2022-23 पर्यंत 34 हजार 745 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 33 हजार 816तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 929 योजनांचा समावेश आहे. या योजनांची अंदाजित किंमत 54 हजार 188 कोटी रुपये आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी या योजना वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक वाढीव निधी देण्यात यावाअशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. 

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi